आपल्याला माहिती आहे .सरकारी विभागामध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे प्रशासनावर पडणारा ताण हा खूप मोठा आहे. त्यामुळे विविध विभागात असणाऱ्या सर्वसामान्यांच्या कामावर ताण पडतो. त्यामुळे शेतकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांची कामे रखडतात. त्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे.
सरकारने यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या 80 टक्के पदांची पदभरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या पदभरतीसाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील करत आहे त्यामुळे सरकारने एक मे ते सात मे दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतलेला आहे .या जाहिराती अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेत येणारी पदभरती देखील सुरू करण्याच्या तयारीत शासन आहे तरी आता शासनाने नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत असणारी अडीच हजार पदांपैकी 80 टक्के पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आपल्याला माहित आहे या अगोदर राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75000 जागांची पदभरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे .तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विविध विभागातील रिक्त पदांच्या जागेचा आढावा घेतला आहे. आढाव्यामध्ये आढळून आले की शासनामध्ये एक लाख 45 हजार जागांची पदभरती करण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारी त असल्याचेही समजले.
सत्यात राज्यातील 6000 जागांच्या वर जिल्हा परिषदेतील जागा भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. राज्यांमध्ये गट क व गट ड वर्गाची पदसंख्या मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी 2738 जागांपैकी वर्ग क च्या जागा या जास्त प्रमाणावर रिक्त आहेत .यामध्ये 2538 जागा या फक्त गटकसंवर्गाच्या आहेत आणि 188 जागा या गट ड संवर्गाच्या आहेत..
आता राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदेंना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 80 टक्के पदांची भरती करण्याचा निर्णय दिला आहे .त्यामुळे राज्यामध्ये गेली तीन ते चार वर्ष रखडलेली पदभरती आता मोठ्या प्रमाणावर सुरू होण्याचे संकेत आहेत या अगोदर फेब्रुवारी महिन्यामध्ये पदभरती करण्याचे शासनाने संकेत दिले होते पण आता भरती प्रक्रिया ही मेमध्ये होणार आहे या प्रक्रियेमध्ये तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे.
परीक्षा म्हटली की त्यामध्ये परीक्षेचे टप्पे आले जसे अर्ज करणे प्रत्यक्ष परीक्षा घेणे पेपर तपासणी होणे रिझल्ट लागणे .प्रत्यक्ष पदावर नियुक्ती होणे या प्रक्रियेला जवळपास तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे.
पदभरती संदर्भात शासनाने टाकलेले हे मोलाचे पाऊल आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा तसेच राज्यातील विविध विभागांमध्ये पदभरती झाल्यामुळे सर्वसामान्यांना मात्र दिल्यासा मिळण्याचे संकेत आहेत त्याचबरोबर राज्यांमधील वारंवार पदभरतीला होणारा विलंब यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी मात्र त्रस्त ला आहे .त्यामुळे शासनाने ही प्रक्रिया वेळेत आणि एकदम पारदर्शीपणे पार पाडणे खूप महत्त्वाचे आहे.
शासनाच्या रोज रोज नोकऱ्यांविषयी येणाऱ्या बातम्या पदभरतीला होणारा उशीर यामुळे प्रशासन परीक्षार्थी सामान्य जनता मात्र परेशान आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ पद भरती करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा .आताही पाहणे महत्त्वाचे राहील की राज्य शासन पदभरती प्रक्रिया केव्हा सुरू व केव्हा पूर्ण करते.
Tags
नौकर भरती
